भारतीय जीवन विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (समान्य) पदाच्या ३५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (आयटी) पदाच्या १५० जागा
शैक्षणिक पात्रता – कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा एसीए किंवा एमएससी (कॉम्पुटर सायन्स) उत्तीर्ण असावा.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (सीए) पदाच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीसह सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (व्यावसाईक) ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि पेपर CT-1 आणि CT-5 प्लस (4) उत्तीर्ण असावा.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (राजभाषा) पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हिंदी/ हिंदी अनुवादमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजी/संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 मार्च २०१९ रोजी १८ ते ३१ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

प्रवेशपत्र – २२ ते ३० एप्रिल २०१९ उपलब्ध होईल.

परीक्षा – पूर्व परीक्षा ४ आणि ५ मे २०१९ रोजी आणि मुख्य परीक्षा २८ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Leave a Reply